Eduwadi

सेट वा नेट परीक्षे संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न ?

सेट आणि नेट परीक्षेतील फरककाय आहे? (Difference Between SET and NET Exam)
सेट आणि नेट परीक्षा मार्गदर्शन

सेट आणि नेट परीक्षेतील फरककाय आहे? (Difference Between SET and NET Exam)

१. सेट आणि नेट परीक्षेतील फरककाय आहे? (Difference Between SET and NET Exam)

उत्तर : सेट (SET) व नेट (NET) हया दोन स्वंतत्र परीक्षा आहेत सेट म्हणजेच राज्य पात्रता परीक्षा (State Eligibility Test) होय. तर नेट (NET) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Eligibility Test) होय.

२. नेट वा सेट पात्र होणे का आवश्यक आहे ?

उत्तर : सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठीची एक आवश्यक पात्रता म्हणजे सेट वा नेट परीक्षा पात्र असणे होय. तुम्ही सेट वा नेट परीक्षा पास आहात म्हणजेच तुम्ही ‘सहाय्यक प्राध्यापक’ या पदासाठी पात्र आहात.

३. नेट वा सेट परीक्षेचे स्वरूप कसे आहे ?

उत्तर: नेट वा सेट परीक्षा ही साधारणपणे एक दिवसाची परीक्षा असते. ज्यामध्ये एकूण दोन पेपर (Two Papers) असतात पेपर पहिला (Paper-I) हा सर्व विषयासाठी समान असतो. तर पेपर दुसरा (Paper-II) तुम्ही ज्या विषयाची निवड परीक्षेसाठी केली आहे उदा. शिक्षणशास्त्र किंवा अर्थशास्त्र त्यावर आधारित असतो.

४. नेट वा सेट परीक्षेची पात्रता काय असते ?

उत्तर: नेट वा सेट परीक्षेची पात्रता म्हणजेच तुम्ही ज्या विषयात पदव्युत्तर पदवी (M.A./ M.Sc./M.Ed. etc) पास आहात त्या विषयात ही परीक्षा तुम्हाला देता येते

५. नेट वा सेट परीक्षेचा अभ्यासक्रम कोठे मिळेल ?

उत्तर: नेट वा सेट परीक्षाचा अभ्यासक्रम तुम्हाला खालील वेबसाईट वर मिळेल. पुणे विदयापीठाच्या https://setexam.unipune.ac.in/syllabusofpapers.aspx या वेब लिंक वर (SET Exam Syllabus) सेट परीक्षेचा अभ्यासक्रम मिळेल तर https://www.ugcnetonline.in/syllabus-new.php युजीसीच्या या वेब लिंक वर (NET Exam Syllabus) नेट परीक्षेचा अभ्यासक्रम मिळेल.

६. सेट व नेट परीक्षेचे माध्यम कोणते असते ?

उत्तर : सेट ही परीक्षा मराठी व इंग्रजी (Marathi & English Medium) माध्यमात असते. तर नेट ही परीक्षा हिंदी व इंग्रजी (Hindi and English) माध्यमात असते. मात्र भाषा विषय यास अपवाद आहेत भाषा विषयातील परीक्षा ज्या विषयात परीक्षा देणार आहात त्याच भाषेत असते. उदा. मराठी भाषा??? यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थी वारंवार विचारतात. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर बिनधास्तपणे विचारा. यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता.

सेट आणि नेट परीक्षेत काय फरक आहे ? (Difference Between SET and NET Exam)

फरक SET (सेट) NET (नेट)
पूर्ण रूप (Full form) राज्य पात्रता परीक्षा (SET- State Eligibility Test) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET-National Eligibility Test)
व्याप्ती महाराष्ट्र व गोवा संपूर्ण भारतभर
परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी हिंदी आणि इंग्रजी
पात्रता निकष पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) पदव्युत्तर पदवी (Master’s Degree)
अभ्यासक्रम सेट आणि नेट परीक्षेच्या अभ्यासक्रमात कोणताही फरक नाही सेट आणि नेट परीक्षेच्या अभ्यासक्रमात कोणताही फरक नाही
हेतू सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) प्राप्त करणे.
स्वरूप एकुण दोन पेपर असतात. एकुण दोन पेपर असतात.
एकूण किती विषयात परीक्षा घेतली जाते. ७१ १०३
नोकरी केवळ महाराष्ट्र व गोवा या ठिकाणी नोकरी करण्यास पात्र (Eligible in Maharashtra and Goa) सर्व भारतभर नोकरी करण्यास पात्र (All India)
वेबसाईट http://setexam.unipune.ac.in https://ugcnet.nta.nic.in
NOTE: विज्ञान विषयाकरिता परीक्षा ही THE U.G.C. AND THE C.S.I.R. (COUNCIL FOR SCIENTIFIC AND INDUSTRIAL RESEARCH) मार्फत घेतली जाते.

सेट आणि नेट परीक्षे बाबत वरील बाबी लक्षात घेतल्यानंतर आपणास लक्षात येते की, दोन्ही परीक्षेच्या अभ्यासक्रमात कोणताही फरक नाही तसेच पेपरसंख्या ही सारखीच आहे.

या दोन्ही परीक्षेतील फरक आपल्या लक्षात आला आहेच ! तर चला तर मग परीक्षेची तयारी करूयात !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top