सेट / नेट : पेपर पहिला
सामान्य पेपर 1: अध्यापन आणि संशोधन अभियोग्यता
पेपर कोड : 00
उद्दिष्टे (Objectives)
- उमेदवारांच्या अध्यापन आणि संशोधन क्षमतांचे मूल्यमापन करणे.
- उमेदवारांच्या अध्यापन आणि संशोधन अभियोग्यतेचे मूल्यमापन करणे.
- आकलन, विश्लेषण, मूल्यमापन, तर्कशक्ती, युक्तिवादांची रचना समजून घेणे व उद्गामी आणि अवगामी तार्किकता यांसारख्या संज्ञात्मक क्षमतांचे मूल्यमापन करणे.
- उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन व अध्ययनाच्या प्रक्रियेविषयी सामान्य जागरूकता.
- व्यक्ती, पर्यावरण, नैसर्गिक संसाधने व जीवनाच्या गुणवत्तेवरील परिणामांची जाणीवजागृती सुनिश्चित करणे.
घटक-I: अध्यापन अभियोग्यता (Teaching Aptitude)
- अध्यापन: संकल्पना, उद्दिष्टे, अध्यापनाचे स्तर (स्मृती स्तर, आकलन स्तर आणि चितंनात्मक स्तर), अध्यापनाची वैशिष्ट्ये व मूलभूत आवश्यकता.
- अध्यनार्थ्यांची वैशिष्ट्ये: किशोरवयीन अध्ययनार्थी आणि प्रौढ अध्ययनार्थी यांची वैशिष्ट्ये (शैक्षणिक, सामाजिक, भावनिक व बोधात्मक), व्यक्तिभेद
- अध्ययनावर परिणाम करणारे घटक: शिक्षक, विद्यार्थी, सहाय्यभूत साहित्य, अनुदेशन सुविधा वा साधने, अध्ययन वातावरण व संस्था.
- शिक्षणातील अध्यापनाच्या पद्धती: शिक्षक-केंद्रित विरुद्ध विद्यार्थी-केंद्रित पद्धती; ऑफलाइन विरुद्ध ऑनलाइन पद्धती (स्वयम, स्वयमप्रभा, मूक (MOOCs) इत्यादी).
- अध्यापनाच्या सहाय्यभूत प्रणाली: पारंपरिक, आधुनिक आणि आयसीटी आधारित.
- मूल्यमापन प्रणाली: मूल्यमापनाचे घटक आणि प्रकार, उच्च शिक्षणातील निवड आधारित श्रेयांक प्रणाली (Choice Based Credit System) मूल्यमापन , संगणक आधारित चाचणी (Computer Based testing), मूल्यांमापन पद्धतीतील नावीन्यपूर्णता
घटक-II: संशोधन अभियोग्यता (Research Aptitude)
- संशोधन: अर्थ, प्रकार आणि वैशिष्ट्ये, संशोधनातील प्रत्यक्षवाद (Positivism) आणि उत्तर-प्रत्यक्षवादी दृष्टिकोन (Positivism and Post Positivistic approach in research)
- संशोधन पद्धती: प्रायोगिक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, गुणात्मक व संख्यात्मक संशोधन पद्धती
- संशोधनाच्या पायऱ्या…
- प्रबंध (Thesis) आणि संशोधन लेख (Article) लेखन: आराखडा (प्रारूप) आणि संदर्भ लेखनाच्या शैली
- संशोधनातील ICT वापर
- संशोधन नैतिकता (Research Ethics)
घटक-III: आकलन (Comprehension)
एका परिच्छेदाचे विवेचन दिले जाईल व त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील.
घटक-IV: संप्रेषण (Communication)
- संप्रेषण: अर्थ, प्रकार व वैशिष्ट्ये
- प्रभावी संप्रेषण: शाब्दिक आणि अशाब्दिक (Verbal and Non-verbal), आंतर-सांस्कृतिक (Inter-Cultural) व समूह संप्रेषण (Group communications), वर्गातील संप्रेषण (Classroom communication)
- प्रभावी संप्रेषणातील अडथळे
- जनसंपर्क माध्यमे आणि समाज
घटक-V: गणितीय तर्कशक्ती व अभियोग्यता (Mathematical Reasoning)
- तर्काचे प्रकार
- संख्या मालिका, अक्षर मालिका, कोड व नातेसंबंध
- गणितीय अभियोग्यता (भाग, वेळ व अंतर, गुणोत्तर, प्रमाण आणि टक्केवारी, नफा आणि तोटा, व्याज आणि सुट, सरासरी इ.).
घटक-VI: तर्कशक्ती (Logical Reasoning)
- युक्तिवादाची रचना समजणे: युक्तिवादाचे प्रकार, श्रेणीसंबंधी विधाने, मूड व आकृती, औपचारिक व अनौपचारिक तर्कदोष, भाषेचा वापर, शब्दांच्या अर्थदर्शन व अभिप्राय
- निष्कर्षक व अंतर्गत तर्कशक्तीचे मूल्यांकन
- साम्ये,वेन चित्र: युक्तिवादाच्या वैधतेसाठी सोप्या व एकाधिक वापर.
- भारतीय तर्कशास्त्र: ज्ञानाचे मार्ग
- प्रमाणे: प्रत्यक्ष (ज्ञान), अनुमान (तर्क), उपमान (तुलना), शब्द (वाचन), अर्थापत्ती (अर्थबोध) आणि अनुपलब्धी (अनुभव न होणे).
- अनुमानाची रचना व प्रकार, व्याप्ती (अनिवार्य संबंध), हेत्वाभास (तर्कदोष).
घटक-VII: माहितीचे अर्थनिवर्चन (Data Interpretation)
- माहितीचे स्रोत, प्राप्ती व वर्गीकरण
- गुणात्मक व संख्यात्मक माहिती
- आलेखात्मक सादरीकरण (बार-चार्ट, हिस्टोग्राम, पाई-चार्ट, टेबल-चार्ट व लाईन-चार्ट) व माहितीचे मॅपिंग
- माहितीचे अर्थनिवर्चन
- माहिती आणि प्रशासन
घटक-VIII: माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (ICT)
- आयसी टी ICT: सामान्य संक्षेप व परिभाषा
- इंटरनेट, इंट्रानेट, ई-मेल, ऑडिओ व व्हिडिओ-कॉन्फरन्सिंगची मुलभूत माहिती.
- उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रम
- आयसीटीICT व प्रशासन…
घटक-IX: लोक, विकास आणि पर्यावरण (People, Development & Environment)
- विकास व पर्यावरण:सहस्रक विकास व शाश्वत विकास ध्येय
- मानव व पर्यावरण आतंरक्रिया: मानवी क्रिया व त्यांचे पर्यावरणावर होणारे परिणाम
- पर्यावरणीय समस्या: स्थानिक, प्रादेशिक व जागतिक; वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, कचरा (घन, द्रव, जैववैद्यकीय, धोकादायक, इलेक्ट्रॉनिक), हवामान बदल आणि त्याचे सामाजिक, आर्थिक व राजकीय परिणाम
- प्रदूषकांचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम.
- नैसर्गिक व ऊर्जा स्त्रोत: सौर, वायू, मृदा, जल, भू-औष्णिक, जैववायू, अणुऊर्जा व जंगल
- नैसर्गिक आपत्ती व धोके: निवारण धोरणे
- पर्यावरण संरक्षण अधिनियम (1986), हवामान बदलासाठी राष्ट्रीय कृती योजना, आंतरराष्ट्रीय करार/प्रयत्न – मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रिओ शिखर संमेलन, जैवविविधता करार, क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस करार, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. /li>
घटक-X: उच्च शिक्षण प्रणाली (Higher Education System)
- प्राचीन भारतातील शिक्षण संस्था
- स्वातंत्र्योत्तर भारतातील उच्च शिक्षण व संशोधनाचा विकास
- भारतातील प्राच्य, पारंपरिक व अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम
- व्यावसायिक, तांत्रिक व कौशल्य आधारित शिक्षण
- मूल्य शिक्षण व पर्यावरण शिक्षण…
- धोरणे, प्रशासन आणि शासन